ट्रक-हार्वेस्टर धडकेत पाच ठार

By Admin | Updated: March 6, 2017 18:00 IST2017-03-06T18:00:55+5:302017-03-06T18:00:55+5:30

भरधाव केळीचा ट्रक समोरून येणाऱ्या हार्वेस्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह पाच जण ठार झाले

Five killed in truck-harvester crash | ट्रक-हार्वेस्टर धडकेत पाच ठार

ट्रक-हार्वेस्टर धडकेत पाच ठार

ऑनलाइन लोकमत
बऱ्हाणपूर, दि. 6 - भरधाव केळीचा ट्रक समोरून येणाऱ्या हार्वेस्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह पाच जण ठार झाले तर तीन जणांना किरकोळ दुखापत झाली. इच्छापूर-इंदूर राज्यमार्ग क्रमांक २७ वरील निंभोला गावाजवळ रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला.
दरम्यान, अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. निंभोला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या असीरगड गावाजवळील ब्लार्इंड टर्नवर सावदा येथून दिल्लीकडे केळी घेवून जात असलेला ट्रक (आऱजे़११ जी़ए़८४१०) ने समोरून येत असलेल्या हार्वेस्टर (एच़आऱ७५-३२५३) ला समोरून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की हार्वेस्टरमधील अनिल गुमानसिंह (३०), कमलेश बाबूलाल (३५), कालू गणेश (२८), धीरज बालमुकुंद (३०, सर्व रा़बिदीशा, मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक कम्प्युटर भोगीराम (३२, ढोलपूर, राजस्थान) यांचे सोमवारी बऱ्हाणपूरच्या शासकीय जवाहरलाल नेहरू रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातात ट्रकमधील राजू तेजसिंह (३२, ढोलपूर, राजस्थान) व रामराज लज्जाराम (२२) व सोनू फुलेराम (३०, दोन्ही मुरेना, मध्यप्रदेश) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बऱ्हाणपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. निंभोला पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. निंभोरा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Five killed in truck-harvester crash