ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 21:31 IST2021-02-06T21:31:18+5:302021-02-06T21:31:50+5:30

वडगाव लांबे येथे हाणामारीत जखमी कोमल रामसिंग जाधव (६०) याचा शनिवारी पहाटे धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

The first victim of violence in the Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी

ग्रामपंचायत निवडणुकीतील हिंसाचाराचा पहिला बळी

ठळक मुद्देवडगाव लांबे येथील हाणामारीतील जखमीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हाणामारीमध्ये जळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला. वडगाव लांबे  ता. चाळीसगाव येथे हाणामारीत जखमी कोमल रामसिंग जाधव (६०) याचा शनिवारी पहाटे धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर वडगाव लांबे येथे जोरदार हाणामारी झाली होती. यात तीन जण जखमी झाले होते तर दोन्ही गटातील २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमींपैकी कोमल जाधव याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
 याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

त्याच्यावर सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Web Title: The first victim of violence in the Gram Panchayat elections