शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 Live: मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय?
4
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
5
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
6
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
7
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
8
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
9
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
10
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
11
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
12
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
13
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
14
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
15
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
16
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
17
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
18
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
19
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:36 IST

Jalgaon Crime News: महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच जळगाव शहरातील एका भागात गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली. 

महापालिका निवडणुकीसाठी सकाळपासून जळगाव शहरात मतदान सुरू आहे. प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच शहरातील पिंप्राळा परिसरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि शहरात खळबळ माजली. या प्रकरणाबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली आहे. 

जळगाव शहरामधील पिंप्राळा भागात आनंद मंगल नगर आहे. याच परिसरात दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. दोघांमध्ये सुरूवातीला शा‍ब्दिक वाद झाला. त्यानंतर वाद टोकाला गेला आणि एका तरुणाने बंदूक काढून गोळीबार केला. 

अचानक गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घाबरले. मतदानाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले. गोळीबाराच्या घटनेबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरल्यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

गोळीबाराचे कारण काय?

गोळीबाराबद्दल माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.  पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले की, "या गोळीबाराचा जळगाव महापालिका निवडणुकीशी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीये. दोन गटांतील जुन्या वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे."

या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने जळगावमधील संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मतदान केंद्रांवरील सुरक्षेवर विशेष लक्ष वाढवण्यात आले असून, गोळीबार करणाऱ्या आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Firing during Jalgaon voting: Police clarify personal dispute, not political.

Web Summary : Jalgaon witnessed firing during municipal elections due to a personal dispute, unrelated to politics. Police assured citizens, urging them to disregard rumors as voting continues smoothly with heightened security. Investigation underway to apprehend culprits.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Jalgaon Municipal Corporation Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिस