शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 

By विजय.सैतवाल | Updated: November 18, 2024 10:34 IST

तीन राउंड फायर : पोलिस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन शेख (५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) यांच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. यावेळी तीन राउंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत शेख यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. ही घटना सोमवारी पहाटे घडली. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख हे विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव शहर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. शिक्षक असलेले शेख यांचे शेरा चौकामध्ये घर आहे. सोमवारी (१८ नोव्हेंबर) पहाटे घरातील सर्वजण साखर झोपेत असताना अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या घरावर तीन राऊंड फायर केले. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काच फुटल्या आहे. 

मोठा आवाज झाल्याने कुटुंबीय जागे झाले त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.  पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

सीसीटीव्हीत घटना कैदपोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात ही घटना कैद झाली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jalgaonजळगाव