बळीराम पेठेत व्यापारी संकुलात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:12+5:302021-09-13T04:16:12+5:30
बळीरामपेठेतील एस.एस.डी मार्केट तीन मजली असून लिफ्टसाठी जागा सोडण्यात आलेली आहे, मात्र तेथे लिफ्ट बसविण्यात आलेली नाही. यात रेडिमेड ...

बळीराम पेठेत व्यापारी संकुलात आग
बळीरामपेठेतील एस.एस.डी मार्केट तीन मजली असून लिफ्टसाठी जागा सोडण्यात आलेली आहे, मात्र तेथे लिफ्ट बसविण्यात आलेली नाही. यात रेडिमेड कपडे तसेच इतर दुकाने आहेत. प्रत्येक मजल्यावरील या लिफ्टच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. या कचऱ्याला रविवारी आग लागली. मार्केटमधून धूर येत असल्याचा प्रकार काही दुकानदारांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने एस.एस.डी मार्केटमध्ये नयना ट्रेडर्स या दुकान मालकासह महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती कळविली. अग्निशमनचे दोन बंब लगेच घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली. चार वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम चालले. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वी या मार्केटमध्ये गादी बनविण्याचे काम चालायचे. हे काम बंद झाले असून जुन्या गादी, कापूस व इतर कचरा या ठिकाणी साचला होता, त्यालाच ही आग लागली. आगीचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.