जळगावमधील कजगाव येथे दुकानाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 09:47 IST2018-03-23T09:47:04+5:302018-03-23T09:47:04+5:30
कजगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणा-या महाराष्ट्र सुपर शॉप दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.

जळगावमधील कजगाव येथे दुकानाला भीषण आग
जळगाव - कजगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणा-या महाराष्ट्र सुपर शॉप दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. मध्यरात्री लागलेली आग सकाळी सहा वाजता आटोक्यात आली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव येथील अग्नीशमन केंद्रांच्या तीन बंबांच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले. ५० लाखाहुन अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्र सुपर शॉपी दुकानाला आग लागल्याचे पहाटे तीन वाजता लक्षात आल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. संपूर्ण गावच येथे गोळा झाल्याने काही वेळ गोंधळही उडाला. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव येथील अग्नीशमन केंद्रांना कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. आग सहा बंब पाणी टाकून विझली. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की शेजारच्या गोडाऊन मध्ये लावलेल्या चारचाकी गाडीलाही झळ पोहचली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.