शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात जलसाठ्याची ‘पन्नाशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST

जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, रविवारी (दि. ५) हा ...

जळगाव : पावसाळ्याच्या शेवटचा महिना उजाडला त्यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील एकूण जलसाठ्याने पन्नाशी ओलांडली असून, रविवारी (दि. ५) हा साठा ५१.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून घट होत गेलेल्या वाघूर धरणसाठ्यातही गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वाढ होऊन धरणसाठा ६९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गिरणा धरणसाठाही ४७.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

यंदा सलग पाऊस नसल्याने मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये किरकोळ चढ-उतार होत गेला. जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पांमध्ये ३२.७३ टक्के जलसाठा होता. तो ७ ऑगस्टपर्यंत केवळ ३६.०६ टक्क्यांवर पोहोचला. दोन महिन्यांत केवळ ३.३३ टक्के वाढ होऊ शकलेल्या जलसाठ्यात मात्र आता ७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान थेट १५.६९ टक्क्यांनी वाढ होऊन जिल्ह्यातील एकूण जलसाठा ५१.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

चार दिवसांत ‘वाघूर’मध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढ

जळगाव व जामनेर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या वाघूर धरण साठ्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर वाढ होण्याऐवजी उलट घट होत गेली होती. त्यामुळे ६५.०८ टक्क्यांवरून धरणसाठा ७ ऑगस्टपर्यंत ६२.१७ टक्क्यांवर आला होता. मात्र, गेल्या चार दिवसांतच या धरणसाठ्यात ७.६६ टक्क्यांनी वाढ झाली व धरणसाठा ६९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाघूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात चांगली आवक सुरू झाली आहे. १ सप्टेंबर रोजी या धरणात ६२.६६ टक्के जलसाठा होता तो दररोज वाढत गेला व आता ७० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. यंदा ६९.९२ टक्क्यांपर्यंत वाघूर धरणाचा साठा पोहोचला असला तरी गेल्या वर्षी याच दिवशी हे धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळ्याचा शेवटचा महिना उजाडला तरी ते ३० टक्क्यांनी खालीच आहे.