फत्तेपूरला सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:23 IST2023-04-28T16:23:22+5:302023-04-28T16:23:50+5:30
२६ रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २७ रोजी गारपिट तर शुक्रवार २८ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

फत्तेपूरला सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले
- रमेश पाटील
फत्तेपूर, जि. जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर आणि परिसराला आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वारा आणि वळवाच्या जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. २६ रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २७ रोजी गारपिट तर शुक्रवार २८ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट त्यातच मुसळधार पाऊस व चक्रीवादळ असा भयावह प्रकार फत्तेपूर आणि परिसरातील ग्रामस्थांनी अनुभवला. या सलग तिसऱ्या दिवशीही झालेल्या या पावसामुळे शेतकरी पार खचला आहे. सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे परिसरातील केळीच्या बागा जवळजवळ उद्ध्वस्त झाल्या आहेत.
लिबूंचा बहार गळून पडला आहे तर कापून पडलेला मका पाण्यात भिजला आहे. वळवाच्या पावसाने जबरदस्त फटका या परिसराला दिला आहे. या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.