शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:16 IST2024-01-04T13:15:37+5:302024-01-04T13:16:29+5:30
...याठिकाणी लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;
जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीत राज्यात जळगावने आघाडी घेतली असून तब्बल ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे. याठिकाणी लवकरच प्रतिदिन ८०० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल.
या प्रकल्पासाठी ४४०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते. डिसेंबरअखेर महसूल प्रशासनाने ३,९५० हेक्टर कंपनीकडे सुपूर्द केले आहे. प्रकल्प उभारणीचे कंत्राटही देण्यात आले आहे. महसूल प्रशासनाने १५ तालुक्यांतील १४० वीज उपकेंद्रांच्या मदतीने ३९५० हेक्टर क्षेत्रावर वीजनिर्मिती करण्याची तयारी ठेवली आहे.
पुरेशा प्रकाशासह क्षमताशील वीज उपकेंद्रांजवळ असणारे गावठाण, शासकीय जमिनी या योजनेसाठी उपलब्ध करून दिली आहे. वीज वितरण कंपनीकरवी या प्रकल्पांना चालना मिळत आहे. येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. त्यातून मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.