शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

कापूस प्रश्नावर शेतकर्‍यांची एकजूट

By admin | Updated: December 1, 2014 14:32 IST

कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला.

मुक्ताईनगर : कापसाच्याभावाबाबत चिंतेत असलेल्या उत्पादक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कापसावर बोला, असा आवाज घुमविला. मुख्यमंत्री क्षणभर थांबले आणि होय त्यावरच बोलतो, असे उद्गार काढत कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचा विचार असल्याची भूमिका जाहीर केली.

खान्देशातील एखाद्या सभेत चक्क मुख्यमंत्र्यांना शेतमालाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा. असे असले तरी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे खान्देशातील शेतकरीही शेतमालाच्या भावाबाबत एकवटू शकतात ही बाब प्रामुख्याने समोर आली. निमित्त होते येथील संत मुक्ताई शुगर अँण्ड एनर्जी साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ व १२मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प भूमिपूजनाचे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणामुळे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा व खान्देशातील मागण्या मांडल्या व मुख्यमंत्र्यांनी सभेत याबाबत घोषणा करावी, जेणेकरून याची इतिहासात नोंद होईल, असे आवाहन केले. मुक्ताईनगर येथे शेतीशास्त्र व तंत्रनिकेतन महाविद्यालय, शहादा-नंदुरबार परिसरातील सिंचन प्रकल्प, चाळीसगाव-भुसावळ औद्योगिक वसाहत आणि उद्योगाबाबतच्या मागण्या पूर्णत्वास अनुकूलता दर्शवत अन्य मागण्यांवर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात समोर असलेल्या शेतकर्‍यांच्या कापसाबाबतची भूमिका जाहीर व्हावी याबाबत संयमाचा बांध सुटला आणि भरसभेत कापसावर बोला, असा आवाज सभामंडपात घुमला.मुख्यमंत्र्यांनी चार सेकंद आपले भाषण थांबविले.होय..त्यावरच बोलतोय, अशी सुरुवात केली आणि कापसाच्या हमी भावावर बोनस देण्याचे जाहीर केले. 
घाईघाईत सत्कार.. 
■ आमदारांच्या सत्काराच्या वेळी तो लवकर व्हावा म्हणून धावपळ झाली.आमदार महाजन, अशोक कांडेलकर, उदय वाघ यांनी आमदारांचे पटापट सत्कार आटोपले.
■ आमदार उन्मेष पाटील या एकमेव आमदारास येथे भाषणाची संधी मिळाली. उन्मेष पाटील यांनी बेलगंगा, सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहत-पाठोपाठ शेतकर्‍यांच्या मनातील कापसाच्या भावाबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडली.