चाळीसगाव तालुक्यात अज्ञात कारच्या धडकेत शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:13 IST2018-11-12T13:13:29+5:302018-11-12T13:13:51+5:30
आडगाव - देवळी दरम्यान अपघात

चाळीसगाव तालुक्यात अज्ञात कारच्या धडकेत शेतकरी ठार
आडगाव, जि. जळगाव : शेतातून घरी परणाऱ्या सर्जेराव संतोष पाटील (५५, रा. आडगाव, ता. चाळीसगाव) यांना अज्ञात कारने धडक दिल्याने ते ठार झाले. हा अपघात चाळीसगाव तालुक्यातील आडगाव ते देवळी दरम्यान रविवारी रात्री झाला.
पाटील हे शेतातून घरी परतत असताना त्यांना अज्ञात कारने धडक दिली व कारचालक वाहनासह फरार झाला. अपघातानंतर जखमी अवस्थेत पाटील यांना टाकळी येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना चाळीसगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. चाळीसगाव येथे हलवित असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.