जामनेर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 12:08 IST2020-10-06T12:07:26+5:302020-10-06T12:08:21+5:30
राजमल सोना चव्हाण असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळून आला.

जामनेर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
ठळक मुद्देराजमल सोना चव्हाण असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळून आला.
जळगाव : खाजगी सावकार, बँक आणि विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज फेडत त्रस्त झालेल्या २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना लोंढ्री ता. जामनेर येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
राजमल सोना चव्हाण असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळून आला.