विहिरीत पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 17:52 IST2021-02-03T17:52:11+5:302021-02-03T17:52:42+5:30
Drowning : या प्रकरणी महेंद्र दिनकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
यावल जि. जळगाव : विहीरीत पाण्याची पातळी पाहत असताना पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचाच विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दहीगाव ता. यावल येथे घडली. प्रेमचंद उर्फ गजानन रामदास महाजन (५६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास ते स्वतःच्या मालकीच्या शेतातील विहिरीत पाण्याची पातळी पहात होते. त्याचवेळी पाय घसरून ते विहिरीत पडले आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी महेंद्र दिनकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेकॉ. सिकंदर तडवी, शेख असलम शेख करीत आहेत.