कुटुंबिय दर्शनासाठी गेले अन् मुलाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:04 IST2021-01-19T22:04:43+5:302021-01-19T22:04:43+5:30

खंडेराव नगरातील घटना : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

The family went for a visit and the child took a hangover | कुटुंबिय दर्शनासाठी गेले अन् मुलाने घेतला गळफास

कुटुंबिय दर्शनासाठी गेले अन् मुलाने घेतला गळफास

जळगाव - कुटुुंबिय यावल तालुक्यातील मनुदेवी या तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी गेले असता, घरी एकट्या असलेल्या गणेश नरेंद्र बाविस्कर (२१, रा. खंडेरावनगर, पिंप्राळा परिसर) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश हा त्याच्या कुटुंंबियांसह खंडेराव नगरात वास्तव्यास होता. सोमवारी सकाळी त्याचे आई वडील तसेच दोन्ही भाऊ व इतर नातेवाईक मनुदेवी या तिर्थक्षेत्रावर गेले होते. यावेळी गणेश हा घरी एकटाच होता. कुटुंबिय सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतले असता, गणेश हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काही दिवसात होणार होता नोकरीवर रूजू

गणेश याच्या पश्चात आई सरला, वडील नरेंद्र बाविस्कर, भाऊ तुषार व दादू असा परिवार आहे. वडील नरेंद्र हे मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. तर दोन्ही भाऊ शिक्षण घेत आहेत. गणेश यास खाजगी बँकेत नोकरीसाठी कॉल आलेला होता. काही दिवसातच तो बँकेत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने गळफास घेवून जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

Web Title: The family went for a visit and the child took a hangover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.