खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 10:25 IST2021-08-31T10:25:37+5:302021-08-31T10:25:46+5:30

भारत राजा चावरे  याने जळगाव शहरात मामाकडे वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले.

False documents, false marriage and false baby; 14-year-old girl abducted and tortured in jalgaon pdc | खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार

खोटी कागदपत्रे, खोटे लग्न अन्‌ बाळही खोटेच; १४ वर्षीय मुलीला पळवून केला अत्याचार

जळगाव : २१ वर्षांच्या तरुणाने १४ वर्षांच्या मुलीला पळवून नेले. तिचे वय १८ दाखवणारा खोटा दाखला जोडून लग्न झाल्याची कागदपत्रे तयार केली. पोलिसांनी अडवले तर तिच्या हाती दुसऱ्याचे बाळ देऊन आम्हा दोघांना बाळ झाल्याचे दाखवले.  इतक्या सगळ्या खोट्या बनावाचा पर्दाफाश जळगाव पोलिसांनी  करत अमरावती येथील भारत राजा चावरे याला अटक केली.  

भारत राजा चावरे  याने जळगाव शहरात मामाकडे वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. तेथे कागदपत्रांमध्ये खोडाखोड करून लग्न केल्याचे कागदपत्र तयार केले. इतकेच नाही तर मुलीच्या हातात दुसऱ्याचे बाळ देऊन आम्हाला एक मूल असल्याचादेखील त्याने बनाव केला. जळगाव पोलिसांनी चावरे याचा या कृत्याचा भंडाफोड केला असून त्याच्यासह गुन्ह्यात मदत करणाऱ्या भाऊ व आईलाही अटक केली आहे.

बलात्काराचे  कलम वाढविले

या प्रकरणात भारत याने पीडितेशी अनैतिक संबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराचे कलम वाढविण्यात आले आहे. कागदपत्रामध्ये खाडाखोड करून बनावट दस्ताऐवज तयार केला म्हणून फसवणुकीचे ४२० व अल्पवयीन मुलीशी लग्न केले म्हणून बालविवाह कायद्याचेही कलम वाढविण्यात येणार आहे.  अटकेतील तिघांना  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: False documents, false marriage and false baby; 14-year-old girl abducted and tortured in jalgaon pdc