जळगाव येथे चोर समजून सालदारालास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 13:24 IST2018-06-24T13:23:26+5:302018-06-24T13:24:51+5:30

जळगाव येथे चोर समजून सालदारालास मारहाण
जळगाव : शेतात आलेल्या गायी काढायला गेलेल्या भाईलाल रुणजी पावरा (रा.वाघझिरा, ता.यावल, ह.मु.जळगाव) याला शिवाजी नगर व गेंदालाल मील भागातील नागरिकांनी चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी शिवाजी नगर परिसरातील शेत शिवारात घडली. जखमी झालेल्या भाईलाल याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. भाईलाल हा जयवंत यशवंत कोल्हे (रा.जुने, जळगाव) यांच्याकडे सालदार म्हणून कामाला आहे. कोल्हे यांचे शिवाजी नगर परिसराला लागूनच शेत आहे. शनिवारी त्यांच्या शेतात दुसऱ्याच्या गायी आल्या होत्या. त्या बाहेर हाकलण्यासाठी कोल्हे यांनी भाईलाल याला सांगितले होते. या गायी काढत असताना गेंदालाल मीलमधील लोकांनी त्याच्या राहणीमानवरुन चोर समजून त्याला बदडून काढले. शुक्रवारीच गेंदालाल मील भागात ७१ हजाराची चोरी झाल्याने लोकांना त्याचा संशय गेला.