रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट ; दोन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 23:03 IST2020-12-23T23:02:46+5:302020-12-23T23:03:42+5:30
रेल्वे हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये गॅस रिफिलिंग करत असताना स्फोट झाला.

रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट ; दोन कर्मचारी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : मध्य रेल्वेच्या शहरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एसी मध्ये गॅस रिफिलिंग करत असताना स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
शशी शंकर व अखिलेश कुमार अशी या जखमींची नावे आहेत. रेल्वे रूग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये इलेक्ट्रीक विभागातील एसी मेंटेनन्स करणारे कर्मचारी शशी शंकर व हेल्पर अखिलेश कुमार हे गॅस रिफिलिंगचे काम करत होते. त्याचवेळी अचानक स्फोट झाला यात वरील दोन जण जखमी झाले. जखमींना रेल्वे रुग्णालयातच उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर रुग्णालयातील रुग्ण घाबरले. याशिवाय उपस्थित डॉक्टर्स व नर्सेस रेल्वेचे कर्मचारी सैरावैरा पळू लागले होते.