शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक वायू व तेल शोधासाठी उत्खनन

By admin | Updated: March 18, 2017 00:28 IST

पथराड परिसर गजबजला : शोधकार्यासाठी ताफा तळ ठोकून

पथराड, ता.धरणगाव : पथराडसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू  महामंडळातर्फे नैसर्गिक वायू आणि तेलाच्या शोधासाठी उपग्रहाशी जोडलेल्या दूरसंवेदक प्रणालीद्वारे सव्र्हे करून ड्रिलिंग (उत्खनन) केले जात आहे. या संशोधनासाठी तीन दिवसांपासून बहुसंख्य विविध प्रकारची वाहने आणि अधिकारी, कर्मचारी व मजुरांचा ताफा तळ ठोकून आहे, त्यामुळे हा परिसर गजबजून गेला आहे.केंद्र सरकारकडून तेल आणि वायूचा शोध घेण्यासाठी सध्या महाराष्ट्रात सव्र्हे केला जात आहे.  त्यातील एक मोठे पथक पथराड परिसरात मुक्कामी आले असून यामध्ये इंडोनेशियातील अधिकारी मोहंमद कमाला शफी यांचाही समावेश आहे.  उपग्रहाशी जोडलेल्या दूरसंवेदक प्रणालीद्वारे ठिकठिकाणी सव्र्हे करून दर एक किलोमीटर अंतरावर जमिनीत ड्रिलिंग केले जात आहे. जमिनीत  ड्रिलिंग (बोअरिंग) करणारे सुमारे वीसच्या वर ट्रॅॅक्टर व विविध यंत्रणा यासाठी वापरली जात आहे.  संशोधक ताफ्यातील बहुतेक अधिकारी, कर्मचारी आंध्र प्रदेशातील असून मजूर बिहारकडील आहेत. शुक्रवारी पथराड परिसरात अनेक ठिकाणी ड्रिलिंग करून हे पथक पुढे पुढे सरकत चावलखेडा परिसराकडे जात असल्याचे सांगण्यात आले.धरणगाव तालुक्यात नैसर्गिक वायू आणि तेलाच्या शोधासाठी केंद्र सरकारच्या ओएनजीसीचे पथक आले आहे. हे पथक पथराडसह चावलखेडा, अनोरे आदी ठिकाणीही परवानगीनुसार जाणार आहे.-कैलास कडलग, तहसीलदार