शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महिना होऊनही ‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारात होणाऱ्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरमधून चूक केल्यामुळे मनपाला बसलेल्या १८ कोटींच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारात होणाऱ्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरमधून चूक केल्यामुळे मनपाला बसलेल्या १८ कोटींच्या भुर्दंडाबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत दिले होते. मात्र, महिनाभरानंतरही मनपा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे डीपीआरच्या कामात चूक करूनही त्या अधिकाऱ्याला मनपा प्रशासनाकडून अभय देण्याचे काम का सुरु आहे? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे डीपीआरमध्ये वाढ केलेल्या १८ कोटी रुपयांचा निधी मनपाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याचा प्रस्ताव महासभेत सर्वच सदस्यांनी विरोध करून, तहकूब ठेवला होता. तसेच ज्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे मनपाला १८ कोटी रुपयांचा भुर्दंड बसला अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. मात्र, तरीही मनपाकडून कारवाई करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी चौकशीला सुरुवातच नाही

या प्रकरणी ज्या अधिकाऱ्याने पहिला डीपीआर न पाहताच मंजूर करून, राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्या अधिकाऱ्याचे नावच अद्याप मनपा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. या प्रकरणी साधी चौकशी देखील मनपाकडून करण्यात आलेली नसून, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला अभय देण्याचे काम मनपाकडून सुरु असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. याबाबत बुधवारी ॲड. दिलीप पोकळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन याप्रकरणी मनपाकडून काय चौकशी झाली?, याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणी ॲड. पोकळे यांनी केली आहे.