पदवी, पदवीका प्रमाणपत्र अर्जांमध्ये त्रुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 20:39 IST2019-11-23T20:39:39+5:302019-11-23T20:39:53+5:30
जळगाव - जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २८ व्या पदवीप्रदान समारंभासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आॅनलाईन पदवी, ...

पदवी, पदवीका प्रमाणपत्र अर्जांमध्ये त्रुट्या
जळगाव- जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २८ व्या पदवीप्रदान समारंभासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आॅनलाईन पदवी, पदवीका प्रमाणपत्र अर्जांची तपासणी करण्यात येत असून या अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत़
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत़ त्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील ई-मेलवर व लॉगीनमधील स्टेप-पाचमध्ये सहकारण त्रुटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या लॉगीन व ई-मेल तपासून अर्जातील त्रुटींची पुर्तता करून विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर तातडीने पाठवावे लागणार आहे़त्यानुसार त्वरित पुर्तता करण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी़पी़पाटील यांनी केले आहे़