भुसावळातील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हारने जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 15:30 IST2021-02-13T15:30:31+5:302021-02-13T15:30:58+5:30
स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हार संघाने जिंकली.

भुसावळातील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हारने जिंकली
ref='https://www.lokmat.com/topics/bhusawal/'>भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे मानाच्या सरपंच क्रिकेट स्पर्धेपूर्वी रंगीत तालीम म्हणून मॉर्निंग सीसीतर्फे विजय मनोरे व दिनेश कुंभार यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हारने जय बजरंगला नमवत तीन धावांनी जिंकली.साकेगावात गेल्या सहा वर्षापासून ग्रामपंचायत साकेगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे खेळाडूंना मैदानी खेळाची सवय लागावी व सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशातून सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा सरपंच निवडीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. तत्पूर्वी या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून स्मरणात आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेत पहिल्या सेमीफायनलमध्ये एम्पायर मल्हारने मातृभूमीला ५ गडी राखत नमविले व अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जय बजरंगने स्पार्टनचा सहा गडी राखून पराभव केला व अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात एम्पायरने जय बजरंग संघाचा तीन धावांनी पराभव स्पर्धा जिंकली. एम्पायर मल्हारतर्फे अबुजर या नवोदित खेळाडूंने स्पर्धेमध्ये सहा गडी बाद केले.