जळगाव जिल्ह्यातून गुलाबो गॅंगचा नायनाट करा -संजय राऊत

By सुनील पाटील | Updated: April 23, 2023 13:52 IST2023-04-23T13:51:23+5:302023-04-23T13:52:21+5:30

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील कार्यक्रमात केलं विधान

Eliminate Gulabo Gang from Jalgaon District says Shiv Sena MP Sanjay Raut | जळगाव जिल्ह्यातून गुलाबो गॅंगचा नायनाट करा -संजय राऊत

जळगाव जिल्ह्यातून गुलाबो गॅंगचा नायनाट करा -संजय राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: जिल्ह्यात एक गुलाबो गॅंग उदयास आली आहे. ही गुलाबो गॅंग अफजल खाना पेक्षाही वाईट आहे. लुटमार करणाऱ्या या गुलाबो गॅंगचा नायनाट करण्याचा  संकल्प करा, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी जळगावात केले. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक साकारले जात आहे. त्याचे भूमिपूजन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार, अरविंद सावंत, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.

संजय राऊत पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊनच शिवसेना निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कवी कुलभूषण यांनी राजांची महती काव्यातून साकारली होती. आज जळगावात उपमहापौर कुलभूषण यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभा राहत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमांमध्ये घुसण्याची भाषा येथे झाली, बघूया कोण घुसतयं. जेव्हा हे स्मारक पूर्ण होईल, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे उद्धव ठाकरे यांना उद्घाटनासाठी आणू, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

Web Title: Eliminate Gulabo Gang from Jalgaon District says Shiv Sena MP Sanjay Raut