पाण्याचा उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:44 IST2023-10-30T17:31:50+5:302023-10-30T17:44:00+5:30
हातगाव, पिंपरखेडमध्ये ६० वर मोटारी बंद

पाण्याचा उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडीत
जळगाव : चाळीसगाव तालुक्याला दुष्काळाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. तशातच सिंचनासाठी सातत्याने पाण्याचा उपसा होत असल्याने ६० मोटारींचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी सामुहिक कारवाई करण्यात आली. मुख्य रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडित केल्याने हातगाव आणि पिंपरखेडमधील ६० वर शेतकऱ्यांच्या अवैध पाणी उपशाला चाप बसला आहे.
गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विजय जाधव, वीजकंपनीचे अभियंता पाटकर, शाखा अभियंता हर्षल पीठे, आर.आर.वाघ, शेळके यांच्यासह वीज कर्मचाऱ्यांनी अनेकदा आवाहन करुनही पाण्याचा अवैध उपसा थांबत नव्हता. कालांतराने हा उपसा रोखण्यासाठी मोटारीही जप्त करण्यात आल्या. तरीही शेतकऱ्यांकडून उपसा सुरु असल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेत वीजकंपनीने मुख्य रोहित्रावरुनच पुरवठा कापण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने शनिवारी सामुहिक कारवाईदेखिल करण्यात आली आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसह हातगाव प्रकल्पातील जलसाठा आता सिंचनासाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले.
फोटो