दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:03+5:302021-07-31T04:17:03+5:30
जळगाव : समोरून येणाऱ्या मालवाहतूक वाहनाला कट मारल्यानंतर चौघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही ...

दुचाकीच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू
जळगाव : समोरून येणाऱ्या मालवाहतूक वाहनाला कट मारल्यानंतर चौघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि.२६ रोजी ४.३० वाजता करंज ते किनोद गावादरम्यान घडली. मंगल पांडू भिल (६०, रा. चिपखेडा मालोद, ता. यावल), असे मयताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी मालवाहतूक चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ जुलै रोजी पुना रुपला बारेला हा त्याच्यासोबत तीन जणांना दुचाकीवर (एमएच-१९ बीई-११४८) बसवून करंज ते किनोद गावादरम्यान घेऊन जात होता. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या मालवाहतूक वाहनाला (एमएच-१९ बीएम-५५८४) पुना याने कट मारला. त्यात पुनासह दुचाकीवरून चौघे रस्त्यावर फेकले गेले. त्यातील मंगल भिल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अखेर मालवाहतूक वाहन चालक सुनील दगडू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक पुना बारेला याच्याविरुद्ध कट मारून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी व भिल यांच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.