शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Eknath Khadse : मुलीचा पराभव करणारा 'गद्दार' कोण हे कळालं, खडसेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 09:37 IST

एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

जळगाव - भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स अडकविण्यात आल्याची चर्चा आहे. आता खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू मांडली आहे. त्यावेळी, जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही नाथाभाऊंनी प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही त्यांनी स्पष्टचं सांगितलं.  

एकनाथ खडसेंना ईडीने घरपोच नोटीस बजावल्याने जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. आता, एकनाथ खडसेंनी ईडीच्या कारवाईसंदर्भात आपणास जाणूनबुजून अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. केवळ 2 कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहारप्रकरणात माझा ईडीचा तपास होत आहे. ते कर्जही मी नियमाने फेडले आहे. विशेषत: ईडीची कारवाई हजार-बाराशे कोटी रुपयांच्या प्रकरणात होत असते, असे खडसेंनी म्हटले. माझ्या जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक  करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत. एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक बिघडायला का मी विश्वामित्र आहे? असा सवालच एकनाथ खडसेंनी विचारला. मी साधा माणूस आहे. पण, मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे, म्हणून हे केले जात आहे, असंही खडसेंनी म्हटले. 

गद्दार ओळखला

राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते, याची आपल्याला माहिती मिळाली. भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितलं. खडसेंनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करत, आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, इन्कम टॅक्स लावल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा