“गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाइकासोबत जेवण केले होते”; एकनाथ खडसेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 08:38 IST2022-03-04T08:37:18+5:302022-03-04T08:38:21+5:30

भाजपची दुटप्पी भूमिका असून, याबाबत खुलासा करावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

eknath khadse criticized bjp girish mahajan had a meal with dawood relatives | “गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाइकासोबत जेवण केले होते”; एकनाथ खडसेंची टीका

“गिरीश महाजनांनी तर दाऊदच्या नातेवाइकासोबत जेवण केले होते”; एकनाथ खडसेंची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इकबाल मिर्ची हा दहशतवादी आहे. त्याचप्रमाणे दाऊदच्या नातेवाइकासोबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये जेवण केल्याचे भाजपला कसे चालते, असा सवाल त्यांनी केला.

खडसे म्हणाले, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. दाऊदच्या नातेवाइकासोबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये जेवण केले. मग त्यांचे संबंध आहेत असे म्हणता येईल का? असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित केला.

याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असे असेल तर भाजपने याचा खुलासा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तर एकनाथ खडसेंची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्यांनी केलेल्या विधानांबाबत काही बोलावे असे वाटत नाही. माझ्याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार करावी. सध्या ते मनात येईल तसे बडबडत असतात, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
 

Web Title: eknath khadse criticized bjp girish mahajan had a meal with dawood relatives