भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 23:31 IST2023-06-09T23:31:21+5:302023-06-09T23:31:42+5:30
घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

भुसावळमध्ये मालगाडीचे आठ डबे घसरले; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
भुसावळ (जि. जळगाव) : नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे आठ डबे रुळावरुन घसरले. ही घटना शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानक यार्डात कॅबिन क्र. १० जवळ घडली. या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
घटनेची माहिती मिळतात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.