आयशर चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:57+5:302021-03-08T04:16:57+5:30
जळगाव : बैलांची वाहतूक करीत असल्याच्या कारणावरून हरिज उस्मान (३०, रा.अक्सानगर, मेहरुण) या आयशर चालकाला दोन तरुणांनी बेदम मारहाण ...
![Eicher driver beaten | आयशर चालकाला मारहाण Eicher driver beaten | आयशर चालकाला मारहाण](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/jalgaon-marathi-default-image-0_202012528118.jpg)
आयशर चालकाला मारहाण
जळगाव : बैलांची वाहतूक करीत असल्याच्या कारणावरून हरिज उस्मान (३०, रा.अक्सानगर, मेहरुण) या आयशर चालकाला दोन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना नशिराबाद शिवारात शनिवारी सकाळी ८ वाजता घडली. या प्रकरणी मारहाण करणारे विनोद भोई व राम करोसिया (रा.नशिराबाद) यांच्याविरुद्ध आयशर चालकाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
एमएच.४६.एई.५५५४ क्रमांकाचे आयशर घेऊन चालक हरिज उस्मान हे शनिवारी सकाळी नशिराबाद शिवारातील उमाळा गावाच्या रस्त्यावरून जात होते. त्याच वेळी विनोद भोई व राम करोसिया हे दोघे दुचाकीवरून येऊन त्यांनी आयशर समोर दुचाकी आडवी उभी केले. त्यानंतर, वाहनात काय आहे, याची विचारणा केली. हरिज याने वाहनात बैल असल्याचे सांगितल्यानंतर, दोघांनी हरिज याला शिवीगाळ करून मारहाण केली. आयशर चालकाने पोलिसात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़