शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

एक दुजे के लिए ! लग्नाला विरोध म्हणून प्रेमीयुगुलाचे विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : नात्यातील ओळख व त्यानंतर प्रेमप्रकरण बहरल्याने लग्नाचा निर्णय घेतलेल्या प्रेमीयुगुलाला घरातून विरोध झाल्याने दोघांनी साथ जियेंगे, साथ ...

जळगाव : नात्यातील ओळख व त्यानंतर प्रेमप्रकरण बहरल्याने लग्नाचा निर्णय घेतलेल्या प्रेमीयुगुलाला घरातून विरोध झाल्याने दोघांनी साथ जियेंगे, साथ मरेंगे असे म्हणत एकत्र येऊन विष प्राशन केले, यात सहा दिवसानंतर प्रेयसीचा मृत्यू झाला तर प्रियकर धोक्यातून बाहेर आला. मोहिनी निंबा कोळी (२२,रा.ममुराबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून समाधान दगडू सैंदाणे (२३,रा.पिंगळवाडे, ता.अमळनेर) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममुराबाद, ता.जळगाव येथील मोहिनीची मोठी बहिण अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथे दिलेली आहे. त्यामुळे मोहिनी हिचे तेथे येणे जाणे असल्याने बहिणीच्या नात्यातीलच समाधान याच्याशी तिचे सूत जुळले. दीड वर्षात दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरले. नात्यात असल्याने अडचण येणार नाही, असा ठाम विश्वास दोघांना होता. मात्र मोहिनीच्या कुटुंबियांकडून त्यास विरोध झाला. याची माहिती मिळाल्यानंतर समाधान याने १९ जानेवारी रोजी दुपारी ममुराबाद गाठले. गावाच्या बाहेर म्हाळसादेवी मंदिरानजीक मोहिनीला बोलावले. तेथे दोघांनी लग्न होत नाही तर जगण्यात अर्थ नाही असे म्हणत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आणि विष प्राशन केले. तत्पूर्वी मोहिनीने घरी फोन करुन तुम्ही लग्नाला परवानगी देत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करीत असल्याचे कळविले. घाबरलेल्या कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दोघांच्या तोंडातून फेस येत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.

या काळात समाधानची प्रकृती सुधारली तर मोहिनीची रविवारी सकाळी प्राणज्योत मालवली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी यांनी समाधान याचा जबाब नोंदविला असता, आमचे दोघांचे एकमेकावर प्रेम होते. आम्ही लग्न करणार होतो, मात्र कुटुंबातून विरोध झाल्याने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. समाधानचा रुग्णालयातून डिस्चार्ज झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक हवालदार संजय चौधरी करीत आहेत.