शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने रेशनच्या लाभार्थींची फिराफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 3:10 PM

स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशीनमुळे गरजुंना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाऱ्या लाभार्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वनवन भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देजामनेर तालुक्यातील चित्ररेशन दुकानातून धान्य मिळत असले तरी अनेकांना सामोरे जावे लागतेय अडचणींनालाभार्थींच्या तहसीलमध्ये होताहेत चकरा

जामनेर, जि.जळगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशीनमुळे गरजुंना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाऱ्या लाभार्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वनवन भटकावे लागत आहे. तसेच दुष्काळी परिस्थितित आर्थिक संकटाला समोरा जावे लागत आहे.लाभार्र्थींच्या चकरावर चकरा?ई-पॉस हे इंटरनेटला संलग्र असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर उपलब्ध असून कार्डधारकाने खरेदी केलेल्या संपूर्ण धान्याचा तपशील विभागाच्या पोर्टलवर तत्काळ येतो. परंतु धान्य घेण्यास गेलेल्या लाभार्र्थींचे ठसे उमटत किंवा ई-पास मशीनमध्ये नाव दिसत नसल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानदार व तहसील कार्यलयात दर रोज चकरा माराव्या लागत आहे.ठसे उमटत नाहीतालुक्यात सध्या सर्वच रेशनकार्डधारक लाभार्र्थींची पडताळणी सुरू आहे. तालुक्यात अंत्योदय योजनेचे १० हजार ५१०, प्राधान्य कुटुंब योजनेचे ३७ हजार ५३९, केशरी कार्डधारक २३ हजार व पांढरे कार्डधारक दोन हजार लाभार्थी आहेत.परिवारातील प्रत्येक लाभार्र्थींचे रेशनकार्डमध्ये संख्येप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्स व ई-पॉस मशीनवर ठसे घेतले जात असून, त्यावरसुद्धा काहींचे ठसे उमट नाही. तसेच आॅनलाइन सॉफ्टवेअर घोळामुळे लाभार्थींचा आधारकार्ड नंबर मॅच होत नाही. परिणामी लाभार्र्थींना अडचण निर्माण होऊन त्यांना त्यांचा हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.दररोज तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर कार्डधारक लाभार्थी आपली मोलमजुरी सोडून भाडे खर्च करून तहसील कार्यालय गाठत असून, मात्र निराश होऊन त्यांना माघारी जावे लागत आहे. वरिष्ठांंनी या समस्येकडे लक्ष देऊन ही फिराफिर थांबवावी, अशी मागणी लाभार्थी करीत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर