शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

जळगावच्या बाजारपेठेत मागणी घटल्याने धान्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:06 PM

धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी झाली असून गव्हाची आवक व मागणीही कमी झाल्याने भाव स्थिर आहेत. वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी सुरू होती, तीदेखील थांबली आहे. गेल्या दोन महिन्यापासून गहू व डाळीमध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. दीड महिनाभरापूर्वी वाढलेल्या तांदळाचे भावदेखील महिनाभरापासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी झाली व त्याचा डाळीवर परिणाम झाला आणि सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात यंदाही पाऊस लांबणार असल्याचे चित्र असल्याने व मागणी वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून धान्य, डाळींचे भाव वाढत होते. मात्र मागणी कमी झाल्याने गेल्या आठवड्यात गव्हाचे भावदेखील कमी झाले होते. या आठवड्यात ते स्थिर असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मुगाच्या डाळीचे भाव १०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ७९०० ते ८३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. उडीदाच्या डाळीच्या भावातही घसरण होऊन ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवरून ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवर तर तसेच तूरडाळीच्या भावातदेखील २०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ते ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरून ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.गव्हाचे भाव स्थिरवर्षभरासाठी धान्य खरेदी थांबल्याने दोन आठवड्यांपासून गव्हाचे भाव कमी झाले आहेत. या आठवड्यात ते स्थिर राहिले. १४७ गव्हाचे भाव २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटल तर चंदोसीचे भाव ३७०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भावदेखील २४०० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून येणाऱ्या गव्हाची आवकही थांबली आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने अडीच महिन्यांपूर्वी तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र महिनाभरापासून हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव