‘त्या’ मद्यधुंद कर्मचाऱ्याला पाजला निलंबनाचा उतारा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 17:59 IST2024-01-01T17:58:52+5:302024-01-01T17:59:03+5:30

प्रेमराज सुभाषराव वाघ (३६, रा. दहिवद, ता. चाळीसगाव) असे या निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे.

' drunken employee got suspension Action by jalgaon Collector | ‘त्या’ मद्यधुंद कर्मचाऱ्याला पाजला निलंबनाचा उतारा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई 

‘त्या’ मद्यधुंद कर्मचाऱ्याला पाजला निलंबनाचा उतारा! जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई 

 कुंदन पाटील 

जळगाव : 'थर्टी फर्स्ट'च्या आदल्यादिवशी मद्यधुंद महसुल कर्मचाऱ्याच्या ‘डर्टी पिक्चर’चे पोस्टर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ फाडले आणि रविवारी निलंबनाचे आदेश जारी करुन ‘थर्टी फर्स्ट’ला कारवाईचा उतारा पाजला आहे. प्रेमराज सुभाषराव वाघ (३६, रा. दहिवद, ता. चाळीसगाव) असे या निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो गृह शाखेत लिपीक म्हणून सेवारत होता. दि.३० रोजी रात्री सव्वा नऊ वाजता मद्यधुंद अवस्थेत कारने (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) आकाशवाणी चौकाकडे निघाला. 

बेधुंद झालेल्या या कर्मचाऱ्याने बॅरिगेट तोडत तीन दुचाकी व एका चारचाकीला धडक दिली होती. यामध्ये चार जण जखमी झाले होते. मद्यपी कारचालकाला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडल्यावर त्याला काही नागरिकांनीही चोप द्यायला निघाले होते. मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने त्याला सुरक्षितपणे जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणले गेले होते. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी त्याला निलंबित केले. गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत त्याला निलंबित करुन त्याच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
 

Web Title: ' drunken employee got suspension Action by jalgaon Collector

टॅग्स :Jalgaonजळगाव