जिल्हा उद्योग केंद्राचे पावती पुस्तक गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:23 IST2020-05-09T19:23:00+5:302020-05-09T19:23:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील शासनास केलेल्या प्रदानाची पावती पुस्तक १० ते १५ फेब्रुवारी या ...

जिल्हा उद्योग केंद्राचे पावती पुस्तक गहाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील शासनास केलेल्या प्रदानाची पावती पुस्तक १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे़ याबाबत उद्योग निरिक्षक मकरंद सरकटे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ दरम्यान, या पावत्यांचा दुरूपयोग झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, असेही जिल्हा उद्योग केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यालयातील नोंदीनुसार पावती पुस्तक क्र. ४०९१४०१ ते ४०९१५६४ पर्यंतच्या वापरलेल्या पावत्या आहेत. व क्र. ४०९१५६५ ते ४०९१६०० पर्यंतच्या न वापरलेल्या ३६ पावत्या आहेत.दरम्यान, सदर पवती पुस्तक कोणाला सापडल्यास तात्काळ जिल्हा उद्योग केंद्रातील महाव्यवस्थापक यांचेकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ तसेच गहाळ झाल्याच्या दिनांकापासून त्या पावत्या रद्द करण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे त्या पावत्या कुणाजवळ आढळून आल्यास व त्याचा दुरूपयोग केल्यास त्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.