यावल उपवनसंरक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:55 AM2019-06-19T11:55:15+5:302019-06-19T11:55:46+5:30

वनपालावर गुन्हा दाखल करा

The district collector was shouted to the same supervisor | यावल उपवनसंरक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

यावल उपवनसंरक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

Next

जळगाव : यावल वनविभागात २००८-०९ मध्ये बदलून आलेल्या वनपाल लोखंडे यांनी वनदाव्यांसाठी २००५ पूर्वीचे अधिवास असल्याबाबतचे दाखले दिल्याचे आढळून आल्याने हे दाखले रद्द करून गुन्हा दाखलचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्यात चालढकल करणाºया यावल विभागाचे उपवनसंरक्षक मोराणकर यांना मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी फटकारले.
मंगळवारी वनदाव्यांवर सुनावणी झाली. त्यात सर्व कागदपत्र योग्य असलेली काही प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर काही प्रकरणांमध्ये आणखी कागदपत्र सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. यावेळी प्रतिभा शिंदे व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Web Title: The district collector was shouted to the same supervisor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव