ज्येष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:36 IST2020-05-28T16:35:43+5:302020-05-28T16:36:36+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जळगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना मास्क व ...

ज्येष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जळगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
या विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून तिनही जिल्हयातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आॅडीओ क्ल्पिव्दारे दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व या समस्यांचे निराकरणही केले जात आहे. जळगाव येथील चौतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वृध्दाश्रमातील ज्येष्ठ सदस्यांना या विभागामार्फत मास्क व सॅनिटायझरचे वाटप कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनीष जोशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी, चौतन्यनगर नागरिक संघाचे अध्यक्ष पंडीतराव सोनार, सचिव देविदास पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या अनिता कांकरिया, सागर येवले उपस्थित होते. या वाटपासाठी विभागाचे सहायक सुभाष पवार, समाजकार्य विभागाचे विद्यार्थी आकाश धनगर, रोहन अवचारे, रितेश चौधरी यांनी सहकार्य केले.