चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 20:12 IST2019-07-26T20:10:02+5:302019-07-26T20:12:10+5:30
प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी यांचा सत्कार व विद्यार्थी पालक प्रेरणा सोहळा चिंचगव्हाण फाट्यावर पार पडला.

चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे गुणवंतांचा गौरव
कळमडू, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दहावी, बारावीत प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी यांचा सत्कार व विद्यार्थी पालक प्रेरणा सोहळा आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिंचगव्हाण फाट्यावरील साईचक्र मंगल कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयकर उपायुक्त प्रवीण चव्हाण होते. या कार्यक्रमाला आयएएस मनोज महाजन, सहाय्यक आयकर आयुक्त विष्णू औटी, आयआरएस अक्षय पाटील, मिशन आयएएस अमरावतीचे संचालक नरेशचंद्र काठोळे, संभाजी निकम, डी.डी.आर ठाणे, मंगेश ठोके, संपदा पाटील उपस्थित होते.
यावर्षी आयएएस झालेले पाचोºयाचे मनोज महाजन यांचा त्यांच्या आई-वडिलासह आयएएस भुवनेश पाटील (शिरपूर), मयूर सूर्यवशी (धुळे) याच्या आई-वडिलांचा, एमपीएससी उत्तीर्ण झालेले पीएसआय राहुल साळुंखे, पराग महाजन, टॅक्स असिस्टंट कल्पना पाटील, १५ गावातील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन सुभाष उगले यांनी केले, तर आभार कळमडू विद्यालयाचे शिक्षक जे.एस. निकम यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शिक्षक प्रवीण पवार व त्यांच्या मित्र परिवाराने केले.