मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 00:12 IST2018-01-22T00:12:27+5:302018-01-22T00:12:40+5:30
धुळे येथून अकोला येथे सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी रात्री ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी आहेत.

मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना
मुक्ताईनगर (जळगाव)- धुळे येथून अकोला येथे सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी रात्री ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी आहेत.
मृतांमध्ये रोमा महेशकुमार तुलसानी (40), नवीन परसराम तुलसानी (22) आणि करिश्मा मोहनलाल दुसेजा (20) यांचा समावेश आहे. हे सर्व धुळ्यातील कुमारनगर येथील रहिवासी आहेत. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे. त्यांची नावे कळू शकलेली नाहीत.