धूमस्टाईलने तरूणाच्या हातातून मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:40 PM2020-08-12T20:40:17+5:302020-08-12T20:40:27+5:30

जळगाव : कंपनीतून काम संपवून मोबाईलवर बोलत घरी निघालेल्या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने मोबाईल चोरून नेल्याची घटना ...

Dhoomstyle pulled the mobile out of the young man's hand | धूमस्टाईलने तरूणाच्या हातातून मोबाईल लांबविला

धूमस्टाईलने तरूणाच्या हातातून मोबाईल लांबविला

googlenewsNext

जळगाव : कंपनीतून काम संपवून मोबाईलवर बोलत घरी निघालेल्या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता एमआयडीसी भागातील गुरांच्या बाजाराजवळ घडली़ याप्रकरणी सुरज नाना पाटील या तरूणाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

अयोध्या नगरात सुरज नाना पाटील हा तरूण कुटूंबीयांसोबत वास्तव्यास आहे़ महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे सध्या सुरज हा एमआयडीसीतील जगवाणी कंपनीत कामाला जात आहे़ दरम्यान, त्याच्याकडे काका धर्मराज मांगो पाटील यांचा १५ हजार रुपए किंमतीचा मोबाईल तात्पुरता वापरण्यासाठी घेतला होता़ ११ आॅगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कंपनीतून काम आटोपून सुरज हा मोबाईलवर बोलत पायी घरी जात असताना गुरांच्या मार्केटजवळ मागून दुचाकीवर २० ते २२ वयोगटातील अज्ञात दोन चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून तेथून पोबारा केला़ घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार त्याने कुटूंबीयांना सांगितला़ त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द पंधरा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी आणि सचिन पाटील करीत आहे.

Web Title: Dhoomstyle pulled the mobile out of the young man's hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.