शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:21 IST

पारोळा पालिकेची सभा : २३ विषयांना मंजुरी

पारोळा : येथील नगरपालिकेची विशेष सभा पालिका सभागृहात पार पडली. यावेळी नव्याने अग्निशमन गाडी खरेदीसह डेंग्यू आजाराची लागण व कमी दिवसांत पाणी पुरवठा करणे या विषयांवर चर्चा झाली.मंगळवारी सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात २३ विषयांना मंजुरी दिली. नव्याने अग्निशमन गाडी खरेदी करण्याच्या विषयावर चर्चा होऊन नगरसेवक नितीन सोनार, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांनी उपाययोजना सुचविल्या. नगरसेवक रोहन मोरे यांनी शहरात डेंग्यूची साथ जोरात सुरू असून त्यावर उपाययोजना करून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशी सूचना मांडली. पाणी पुरवठा सभापती मनिष पाटील यांनी दोन ते तीन दिवसापूर्वीच सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना केल्या होत्या. नगरसेवक अशोक चौधरी यांनी त्यांच्या प्रभागात साधे खड्डेही बुजविले जात नसल्याची खंत व्यक्त केली. बालाजी संस्थानचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वहन रथाच्या मार्गावरील खड्डे बुजवून अतिक्रमणही काढण्यात यावे, अशी सूचना मांडली. मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार मुंडे यांनी याबाबत तत्काळ दखल घेणार असल्याचे सांगितले.सार्वजनिक शौचालये बांधणे, नवीन गटारी व्यंकटेश पार्क येथे नवीन साहित्य खेळणी घेणे, खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे, पंप आॅपरेटरची नियुक्ती करणे, अग्निशमन गाडीचालक पदाची भरती करणे, बालाजी यात्रा महोत्सवावेळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा राबविणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.