शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरुपी कृषी सहाय्यक देण्याची शहापूरच्या शेतकर्‍यांची मागणी

By admin | Updated: April 20, 2015 13:06 IST

कायमस्वरुपी कृषी सहाय्यक नसल्याने शेतकर्‍यांना कामकाजासाठी अडचणी येत असून कायमस्वरुपी कृषी सहाय्याक देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत

शहापूर, ता.जामनेर : कायमस्वरुपी कृषी सहाय्यक नसल्याने शेतकर्‍यांना कामकाजासाठी अडचणी येत असून कायमस्वरुपी कृषी सहाय्याक देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत.येथील कृषी सहाय्यक प्रदीप शेकोकार यांची तीन वर्षापूर्वी बदली झाली असून त्याचा पदभार जामनेर मंडल एकचे नामदेव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांच्या मंडळमध्ये नऊ गावाचा समाविष्ठ असून त्यांचे या परिसराकडे दुर्लक्ष होते. कामकाजासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधल्यास मी माझ्या मंडळमध्ये असल्याचे त्यांचेकडून सांगण्यात येते. शेतकर्‍यांना कामकाजासाठी व नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांना जामनेरला कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांचे या विषयाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)फरकांडे ग्रा.पं. सरपंच आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी इच्छुकांना लागले डोहाळेफरकांडे, ता.एरंडोल : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी (महिला व पुरुष) निघाल्याने इच्छुकांना डोहाळे लागल्याने राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. मतदारांशी संपर्क वाढवून भावी उमेदवार वातावरण निर्मिती करू लागले आहेत.येथील पंचायतीची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होणार असल्याने हवसे, नवसे, गवसे यांची राजकीय आमिषे देणे सुरू झाल्याने मतदारराजांचे करमणूक व चाचपणी देखील सुरू झाली आहे.नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुकीत कोण जिंकले कोण हरले? कसे हरले? कसे जिंकले? याचा तुलनात्मक बाजूचा अभ्यास भावी उमेदवारांनी लक्षात घ्यावा, असा संदेश मतदारांनी दिलेला आहे. कोणाचा पाठिंबा घ्यावा व कुणाला बाजूला टाकावे हे सूत्र भावी राजकारण करणार्‍यांनी लक्षात ठेवले तर चित्र वेगळेच पाहावयास मिळेल अशी लोकचर्चा सध्या गावात सुरू आहे. एवढे नक्की. (वार्ताहर)