जळगावात दीप अमावस्यानिमित्त दीपपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:22 IST2018-08-11T21:19:55+5:302018-08-11T21:22:42+5:30

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी दीपप्रज्वालन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

Deeppujan in Jalgaon Deep Amavasya | जळगावात दीप अमावस्यानिमित्त दीपपूजन

जळगावात दीप अमावस्यानिमित्त दीपपूजन

ठळक मुद्देप.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहातविद्यार्थ्यांना सांगितले दीप अमावस्येचे महत्त्वविद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दिव्याचा केला वापर

जळगाव : गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी दीपप्रज्वालन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. दीप अमावस्या हा दीप पूजनाचा दिवस, अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करून हा दीप आपले जीवन सर्वार्थाने उजळो हीच प्रार्थना मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केली. यावेळी विद्यार्थ्यांना दीप अमावस्येच्या महत्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे दिवे याठिकाणी वापरले. सुंदर अशा पिवळ्या, लाल फुलांच्या रांगोळीमध्ये चमचमणाऱ्या दिव्यांची आरास मांडण्यात आले. यशस्वीतेसाठी इंदू चौधरी व रेखा चौधरी, योगेश भालेराव, धनश्री फालक, सुधीर वाणी, कल्पना तायडे, सरला पाटील, सुनील नारखेडे, आर.व्ही.पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Deeppujan in Jalgaon Deep Amavasya