शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
3
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
4
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
5
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
6
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
7
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
8
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
9
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
11
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
12
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
13
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
14
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
15
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
16
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
17
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
18
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
19
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
20
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 7:34 PM

लोणवाडी येथे २० ते २२ दिवस उलटूनही पाणीपुरवठा न झाल्याने व नुकताच ओडीए योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गावावर तीव्र पाणीटंचाई संकट कोसळले आहे.

ठळक मुद्दे२० दिवस उलटूनही पाणीपुरवठा न झाल्याने पाण्यासाठी शेती परिसरातील विहिरीवरून पाणी आणावे लागते.गावात मुख्य तीन कूपनलिका असल्याने तीनपैकी दोन कूपनलिका वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे.लोणवाडी गावास तीव्र पाणीटंचाईची समस्या कायम

जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.दरम्यान, लोणवाडी गावाची सुमारे चार हाजारांवर लोकसंख्या आहे. गावास मुक्ताईनगर येथील ओडीए योजनेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील व ओडीए योजनेच्या शेवटच्या टोकावरील लोणवाडी गावास तीव्र पाणीटंचाईची समस्या कायम भेडसावत असते. ओडीएच्या पाणीपुरवठ्यात अनियमित असल्याने व नुकताच ओडीए योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गावास २० दिवस उलटूनही पाणीपुरवठा न झाल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी शेती परिसरातील विहिरीवरून पाणी आणावे लागते. तसेच काही नागरिक हे टँकरव्दारे पाणी विकत घेतात. त्यामुळे नागरिकांवर अधिकचा ताण पडतो.गावात ओडीए योजनेव्यतिरिक्त येथील ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत एका महाकाय विहिरीची निर्मिती केली, मात्र या विहिरीत पुरेसा जलसाठा नसल्याने व दोन ते तीन दिवसांनंतर थोड्या-थोड्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला की, तो येथील गुरांसाठी बांधलेल्या गाव हाळात सोडण्यात येतो, असे येथील सरपंच मोहन देठे यांनी सांगितले.याव्यतिरिक्त नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने गावास पाणीटंचाईची झळ नेहमीच भासत असते. तरी गावात मुख्य तीन कूपनलिका असल्याने तीनपैकी दोन कूपनलिका या जलसाठ्याअभावी गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट कायम आहे.टंचाई आढावा बैठकीत गावासाठी टी.पी.डब्ल्यू. एस.योजनेंतर्गत बोरवेलची मागणी करण्यात आली आहे. लवकरच या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.-मोहन देठे, सरपंच, लोणवाडी, ता.बोदवड 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड