उपचारार्थ दाखल तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 21:54 IST2021-02-05T21:54:09+5:302021-02-05T21:54:09+5:30
जळगाव : जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असताना ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

उपचारार्थ दाखल तरूणाचा मृत्यू
जळगाव : जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असताना ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बेंडाळे चौकात गुरुवारी ३४ वर्षीय तरुण हा अत्यवस्थ अवस्थेत नागरिकांना आढळून आला होता. नंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी ८.१० वाजेपूर्वी त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. अद्याप या तरुणाची ओळख पटलेली नाही.