दिवाळीसाठी माहेरी येणाऱ्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:28 IST2017-10-18T18:25:54+5:302017-10-18T18:28:52+5:30

आशिया महामार्गावरील जाडगाव फाट्यावर झाला अपघात

Death of a woman coming to Diwali for Diwali | दिवाळीसाठी माहेरी येणाऱ्या महिलेचा मृत्यू

दिवाळीसाठी माहेरी येणाऱ्या महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देमयत महिला दिवाळीसाठी तळवेल येथील माहेरी येत होती.अपघातानंतर तब्बल एक तास रुग्णवाहिका न आल्याने झाला उपचाराअभावी मृत्यू.अपघातात दुचाकीस्वार सचिन लोहार व शांताराम लोहार झाले जबर जखमी

आॅनलाईन लोकमत
वरणगाव,दि.१८ : दिवाळीसाठी पुण्याहून माहेरी तळवेल येथे येत असताना मालतीबाई सचिन लोहार या विवाहितेचा मंगळवारी रात्री १० वाजता जाडगाव फाट्यावर चारचाकीने धडक दिल्याने मृत्यू झाला.
पुणे येथून दिवाळीसाठी तळवेल येथे मालतीबाई सचिन लोहार व सचिन दयाराम लोहार हे मंगळवारी भुसावळ येथे रात्री १० वाजता पोहचले. एस.टी.कर्मचाºयांच्या संपामुळे तळवेल येथे जाण्यासाठी बस नव्हती. त्यामुळे त्यांनी तळवेल येथील भावास भुसावळ येथे बोलाऊन घेतले. शांताराम दयाराम लोहार, सचिन लोहार व मालतीबाई लोहार हे तिघे भुसावळकडून तळवेलकडे दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.आर.३२१८) ने जात असताना जाडगाव फाट्या जवळ अज्ञात चारचाकीने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात मालतीबाई जागीच ठार झाली. दुचाकीस्वार सचिन लोहार व शांताराम लोहार जबर जखमी झाले. अपघात घडताच जळगावहून वरणगाव येथे येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतोष माळी यांनी त्यांची मदत करीत शासनाच्या १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागविली. रुग्णवाहिका तासभर न आल्याने महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.





 

Web Title: Death of a woman coming to Diwali for Diwali