शेतात विष प्राशन केलेल्या अज्ञात इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:35+5:302020-12-03T04:29:35+5:30
रावेर : शिवारातील देवीदास मानकर यांच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात इसमाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू ...

शेतात विष प्राशन केलेल्या अज्ञात इसमाचा मृत्यू
रावेर : शिवारातील देवीदास मानकर यांच्या शेतात बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात इसमाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
रावेर शिवारातील देवीदास मिठाराम मानकर यांच्या शेत गट नं. ४४९ मध्ये एक ३० ते ४० वर्षे वयोगटातील इसम काहीतरी विषारी औषध प्राशन करून बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. त्यास तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत इसमाची ओळख पटत असल्यास रावेर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे.
===Photopath===
021220\02jal_1_02122020_12.jpg
===Caption===
मयत अज्ञात इसम.