ट्रकने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 21:42 IST2021-05-27T21:41:25+5:302021-05-27T21:42:07+5:30
रस्त्याच्या साईडपट्टीने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने ते ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.

ट्रकने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिल्याने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : रस्त्याच्या साईडपट्टीने पायी जाणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिल्याने ते ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २६ रोजी सायंकाळी ६ वाजता खडकी बायपास चौफुली जवळ घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. मयताचे नाव अरुण पंडीत सूळ (३५, सब स्टेशन खडकी बु.) असे आहे.
मयत अरुण सूळ हे कामानिमित्त एमआयडीसीकडे धुळेरोडने रस्त्याच्या साईडपट्टीने पायी जात असताना त्यांच्या मागून औरंगाबादकडून धुळेकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने (एचआर ७४ ए ८१५६) सुळ यांना मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. शहर पोलीसात प्रविण लक्ष्मण सूळ यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक अब्दुल हमीद रहमत (घासेडा, ता. जि. नुहमेवात, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयत अरुण सूळ हे मजुरी करून उदारनिर्वाह करीत होते.