निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:58+5:302021-06-06T04:13:58+5:30

जळगाव : टेक्निकल हायस्कूल, भुसावळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी दगडू गगणे (न्हावी) (६५, रा. साकेगाव) यांचे अल्पशा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

Next

जळगाव : टेक्निकल हायस्कूल, भुसावळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी दगडू गगणे (न्हावी) (६५, रा. साकेगाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. गोकुळ, मनोज, भूषण गगणे यांचे वडील व प्रभाकर गगणे यांचे ते लहान बंधू होत.

--------

रघुनाथ वाणी

जळगाव : संजय वॉच कंपनीचे संचालक रघुनाथ वाणी (७८, रा. एल.आय.सी. कॉलनी, रिंगरोड) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे व चार भाऊ असा परिवार आहे. रोटरी वेस्टचे नियोजित अध्यक्ष कृष्णकुमार वाणी यांचे ते वडील होत.

-----

विजया सोमवंशी

जळगाव : ज.ज.म. बँकेच्या सेवानिवृत्त अधिकारी विजया सोमवंशी (६०) यांचे गुरुवारी निधन झाले. कु. मोना सोमवंशी यांच्या त्या आई होत.

-----

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.