Death of a passenger bus in the dam | धरणगावात प्रवाशाचा बसमध्ये चढताना मृत्यू
धरणगावात प्रवाशाचा बसमध्ये चढताना मृत्यू

धरणगाव, जि.जळगाव : नाशिक येथे मुलगी--जावईकडे भेटण्यासाठी निघालेल्या येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी नारायण भिवसन आहेराव (वय ७२) यांचो धरणगाव येथे बसमध्ये चढताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. ही घटना दि.१० रोजी सकाळी बसस्थानकावर घडली.
येथील चिंतामण मोरया परिसरातील रहिवासी नारायण भिवसन आहेराव हे १० रोजी पत्नीसोबत नाशिकला जाण्यासाठी साडेसहाला बसस्थानकावर आले. धरणगाव-नाशिक बस सकाळी ७ वाजता आली. बसमध्ये चढताना त्यांना हदय विकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title:  Death of a passenger bus in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.