धोतरात शिरलेल्या नागिणीने दंश केल्याने जळगावात वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 11:28 IST2017-12-07T11:24:42+5:302017-12-07T11:28:19+5:30
वृद्धाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू

धोतरात शिरलेल्या नागिणीने दंश केल्याने जळगावात वृद्धाचा मृत्यू
ठळक मुद्देअंगणवात बसलेले असताना वृद्धाच्या धोतरात शिरली नागिणसोनवणे यांच्या हाताला घेतला नागिणीने चावाजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ : धोतरात शिरलेल्या नागिणीला झटकताना तिने दंश केल्यामुळे हरी महारू सोनवणे (वय ८०) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उमाळा (ता. जळगाव) येथे घडली.
सोनवणे हे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घरी अंगणात बसलेले असताना कुडाच्या दिशेने आलेली विषारी नागीण त्यांच्या धोतरात शिरली. काही तरी गेल्याची चाहूल लागल्याने धोतर झटकले असता विषारी नागीण बाहेर निघाली व तिने काही क्षणातच सोनवणे यांच्या हाताला दंश घेतला. दरम्यान, बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील यांनी तत्काळ या वृद्धाला जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.