गाडेगाव अपघातातील मुलीचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:41 IST2018-08-06T14:39:37+5:302018-08-06T14:41:05+5:30
गाडेगाव येथे शुक्रवारी झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पुजा पवार हिचा मुंबई येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

गाडेगाव अपघातातील मुलीचा अखेर मृत्यू
ठळक मुद्देत्या मुलीची झुंज ठरली अपयशीउपचारा दरम्यान झाले मुंबई येथे निधननेरी गावावर शोककळा
नेरी, ता. जामनेर : गाडेगाव येथे शुक्रवारी झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पुजा पवार हिचा मुंबई येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पुजाच्या मृत्यूमुळे नेरी गावात शोककळा पसरली आहे.
गेल्या शुकक्रवारी एका भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने उमाळे फाटा व गाडेगाव या ठिकाणी आठ जणांना धडक देत जखमी केले होते. या अपघातातील जखमींना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र अवघ्या १४ वर्षीय पुजाचा सोमवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. रविवारी पुजा हिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.